प्रेमासाठी या व्यक्तीनीही केलाय राजघराण्याच्या त्याग


सध्या ब्रिटीश राजपरिवारातील प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्केल यांनी त्यांचा राजघराणे वारसा सोडल्याची चर्चा जगभर सुरु आहे. त्यामुळे आता हे दोघे हिज हायनेस अथवा हर हायनेस पदवी लावू शकणार नाहीत. वर्षाच्या सुरवातीलाच त्यांचा हा निर्णय अनेकांना धक्का देऊन गेला असला तरी राजघराण्याचा त्याग करणारे हे पहिलेच जोडपे नाही. त्यापूर्वीही अनेकांनी प्रेमाखातर राजघराण्याचा वारसा सोडला आहे.


जपानची राजकुमारी आयको हिने तिच्या कॉलेज मधील मित्रासोबत म्हणजे सर्वसामान्य माणसाबरोबर लग्न करण्यासाठी राजघराण्याचा त्याग केला. जपान मध्ये राजकुमारीने सर्वसामान्य माणसाशी लग्न केले तर तिचा राजघराण्याबरोबरचा संबंध संपतो मात्र राजकुमारांना हा नियम लागू नही. अयाकोने २९ ऑक्टोबर २०१८ ला लग्न केले आहे. अश्या प्रकारे राजघराण्याचा त्याग करणारी आयको जपानची ९ वी राजकन्या आहे. तिच्या पूर्वी माको, सायाको, नोरी यांनीही राजघराणे त्यागले आहे.

मलेशियाचा सुलतान मोहम्मद पंचम याने २०१७ मध्ये रशियन मॉडेल बरोबर लग्न करण्यासाठी राजगादी सोडली. रिहाना ओक्साना असे या मॉडेलचे नाव आहे. मात्र हा विवाह टिकला नाही. सुलतानाने रीहानाला घटस्फोट दिला. विशेष म्हणजे मुस्लीमबहुल देशाच्या इतिहासात प्रेमासाठी सुलतानपद त्यागणारा मोहम्मद पंचम पहिला सुलतान आहे.


नॉर्वेची राजकुमारी मार्था हिनेही सर्वसामान्य माणसाशी लग्न करता यावे म्हणून राजघराणे सोडले होते. अरी बेहन या माणसाशी तिने लग्न केले. हे लग्न १५ वर्षे टिकले आणि मग त्यांचा घटस्फोट झाला. १९३६ मध्ये ब्रिटनच्या किंग एडवर्ड आठवा यानेही वोलीस सिम्पसन या अमेरिकन विधवेशी लग्न करण्यासाठी राजगादी सोडली होती.

Leave a Comment