राजकुमार रावच्या पर्सची किंमत ऐकलीत?


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
बॉलीवूड फॅशनचे गरुड जनमानसावरून उतरायला तयार नाही याचा अनुभव नेहमीच येतो. हे तारे कपडे कोणते घालतात, घड्याळे कोणती वापरतात, शूज, गॉगल, घरे, गाड्या अश्या अनेक गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. बॉलीवूड तारकांच्या छोट्या, मोठ्या पर्स, त्यांच्या किमती हाही असाच चर्चेचा विषय. यात आता बॉलीवूड ताऱ्यांनी उडी घेतली असून गुणी अभिनेता राजकुमार राव याची मेन पर्स अशीच चर्चेत आली आहे.

सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा अभिनेता त्याचा ड्रेसिंग सेन्स, स्वतःला कॅरी करण्याची त्याची पद्धत यामुळे चर्चेत असतो. सुटबूट, फॉर्मल ड्रेसिंग, जीन्स टीशर्ट अश्या त्याच्या वेशाबद्दल त्याचे चाहते नेहमीच बोलत असतात. आता त्याने अन्य कलाकारांप्रमाणे त्याच्या एअरपोर्ट लुकवर सिरीयसली विचार करायला सुरवात केली आहे.

मुंबई एअरपोर्टवर तो नुकताच त्याची मैत्रीण पत्रलेखा सोबत दिसला. त्यावेळी त्याची ब्लॅक कलरची मेन पर्स आकर्षणाचा विषय ठरली होती. छोट्या मेसेंजर बॅग प्रमाणे दिसणारी ही पर्स लग्झुरीयस फॅशन ब्रांड लुईस वूटीनची होती. त्यावर ट्रेडमार्क आणि मोनोग्राम होता. या पर्सची किंमत ४८५० डॉलर्स म्हणजे ३ लाख ४४ हजार रुपये असल्याचे समजते.

Leave a Comment