द.कोरियातील अमेरिकन राजदूताच्या मिश्यांवरून विवाद


फोटो सौजन्य कॅच न्यूज
द. कोरियात सध्या अमेरिकेचे या देशातील राजदूत हॅरी हॅरीस यांच्या मिशा वादाचा विषय ठरल्या आहेत. गेले अनेक दिवस यावर वादविवाद होत असून ते थांबण्याची कोणतीही लक्षणे नाहीत असे दिसून आले आहे.

हॅरी हॅरीस माजी नौसेना अॅडमिरल असून त्यांची आई जपानी आणि वडील अमेरिकन आहेत. त्यांचे वडील सुद्धा अमेरिकन नौदल अधिकारी होते. हॅरी हॅरीस यांचा जन्म जपान मध्ये झाला आहे. द. कोरियातील जनतेला हॅरी हॅरीस यांनी मिशा वाढवून यजमान देशाचा अपमान केला आहे असे वाटते आहे. यामागचे कारण म्हणजे हॅरी हॅरीस यांच्या मिशा १९१० ते १९४५ या काळात द. कोरियात जे जपानी वसाहतवादी नियम लावले गेले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जपान मधून जे आठ गव्हर्नर आले त्यांची आठवण करून देतात असा आरोप केला जात आहे. हा सर्व काळ द. कोरीयासाठी वेदनादायी काळ होता आणि आजही या दोन देशांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. टोक्यो शासन हा द. कोरियात आजही संतापाचा विषय आहे.

याचा परिणाम असा झाला होता की गेल्या डिसेंबर मध्ये कोरियन नागरिकांनी अमेरिकन दुतावासासमोर निदर्शने करून त्यात हॅरी हॅरीस यांच्या पोस्टरवर मिश्या भादरून टाकल्या होत्या. या बाबत हॅरी हॅरीस यांचे म्हणणे असे आहे, की ते जपानचे नाही तर अमेरिकचे राजदूत म्हणून येथे आले आहेत. माझ्या मिश्या काही कारणाने येथे आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत . या दोन देशातील शत्रुत्व मी समजू शकतो. पण मी अमेरिकन आहे याचा विसर त्यांनी पडू देऊ नये.

हॅरी हॅरीस यांनी यापूर्वीही दक्षिण आणि उत्तर कोरिया मध्ये चर्चा सुरु व्हायला हवी असे विधान करून विवादाला आमंत्रण दिले होते.

Leave a Comment