जपानने सुरु केली ६ जी नेटवर्कची तयारी


जगात विविध देशात सध्या ५ जी नेटवर्कच्या चाचण्या सुरु असताना जपानने एक पाउल पुढे टाकले आहे. ५ जी नेटवर्क बाबत जपान अन्य देशांच्या अजून खूप मागे असला तरी या देशाने ६ जी नेटवर्कची तयारी सुरु केली असल्याचे जाहीर केले आहे. निक्कीच्या अहवालानुसार जपानने ६ जी नेटवर्क साठीची आउटलाईन तयार केली आहे. जपानचे हे नेटवर्क सध्याच्या ५ जी पेक्षा १० पट अधिक वेगवान असल्याचे सांगितले जात आहे.

जपानने ६ जी नेटवर्क विकसित करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेअर्स आणि कम्युनिकेशन्स ऑफ जपान गव्हर्नमेंटने सिव्हिलियन सोसायटी ऑफ रिसर्च याच महिन्यात स्थापन केली असल्याचे सांगितले जात आहे. येऊ घातलेल्या ५ जी नेटवर्क पेक्षा अधिक वेगवान नेटवर्क साठी अनेक देश प्रयत्नशील आहेतच. त्यात द. कोरिया, चीन व फिनलंड आघाडीवर आहेत.

Leave a Comment