आजकाल कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक फीचर देत असतात. ग्राहक देखील या फीचरकडे आकर्षित होऊन त्वरित कार खरेदी करतात. मात्र या फीचरचा हवा तेवढा वापर होत नसतो. त्यामुळे नंतर ग्राहकांना त्या फीचर्ससाठी अधिक पैसे दिल्याचा पश्चात्ताप होत असतो. अशाच काही फीचर्सबद्दल जाणून घेऊया, जे कारमध्ये नसले तरीही चालते.

कीलेस पुश बटन स्टार्ट –
कीलेस पुश बटन आजकाल सर्व कारमध्ये मिळते. मात्र या फीचरचा वापर अधिक होत नाही. याद्वारे कारला विना चावीचे अनलॉक करता येते व पुश बटनद्वारे कार स्टार्ट होते. सर्व कारमध्ये रिमोट लॉकिंग फीचर देखील मिळते. ज्याद्वारे कार अनलॉक-लॉक करता येते. अधिक पैसे देऊन हे फीचर घेण्याची काहीही गरज नाही.

ऑटोमॅटिक हेडलँम्प –
कार कंपन्या हे फीचरची मार्केटिंग करून कार विकते. मात्र मॅन्युअली देखील कारमध्ये लाइट स्विच ऑन आणि स्विच ऑफ करू शकतात.

सनरूफ –
मिड लेव्हल हॅचबॅक्स आणि स्वस्त कारमध्ये देखील हे फीचर मिळते. भारतासारख्या गरमी व थंडी असणाऱ्या ठिकाणी सनरूफ फीचर जास्त फायदेशीर नाही. सनरूफमुळे कारमध्ये धुळ देखील जाते.

बेज इंटेरियर –
बेज इटेरियर असल्याने कारमध्ये सर्वाधिक घाण होते. कारमध्ये नेहमी गडद रंगाचे इंटेरियर अधिक चांगले वाटते. त्याच्यावरील डाग देखील दिसत नाहीत. बेज रंगला मेनटेन करणे देखील अवघड असते.

टच सेसेंटिव्ह एसी कंट्रोल –
ड्रायव्हिंग करताना मुख्य लक्ष हे ड्रायव्हिंग करणे असते. या फीचरमुळे अनेकदा अपघात होऊ शकतात. एसीचा स्पीड नोबद्वारे देखील कंट्रोल करता येतो व ड्रायव्हिंग दरम्यान हे करणे सोपे असते. विना बघता देखील नोबद्वारे एडजस्ट करता येते. मात्र टच सेसेंटिव्ह बटन दाबताना लक्ष द्यावे लागते.

प्रोक्सिमिटी सेंसर्स –
या फीचरमध्ये कोणतीही दुसरी कार अथवा व्यक्ती आपल्या कारच्या जवळ येताच साउंड अलार्म वाजू लागतात. मात्र भारतात ट्रॅफिकमध्ये या फीचरचा वापर केल्यास अलार्म किती वेळा वाजेल, याचा अंदाज तुम्हीच लावू शकता.

एंबियंट लाइट –
कंपन्या कारमध्ये एंबियंट लाइट फीचर देत आहे. यामुळे कॅबिन सुंदर दिसते. मात्र या फीचर्ससाठी अतिरिक्त पैसे देणे योग्य नाही. या फीचरमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या लाइट्समुळे ड्रायव्हिंग करताना लक्ष विचलित होऊ शकते.

फॉक्स रुफ रेल्स –
अनेक लोक गाडीला स्पोर्टी लूक देण्यासाठी हे फीचर बसवतात. जर तुम्ही कारच्या रूफवर अधिक सामान ठेवत असाल, तर याच्या जागी मेटल कॅरियर लावू शकता. अथवा रूफ बॉक्स देखील लावू शकता.

वॉयस कमांड्स –
भारतात हे फीचर अधिक प्रभावशाली ठरत नाही. कारण याचे कोडिंग परदेशात बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीनुसार केले जाते. भारतीयांचे उच्चारण थोडे वेगळे असते. त्यामुळे ते समजणे अवघड जाते.

ऑटोमॅटिक वायपर्स –
आधी हे फीचर केवळ महागड्या गाड्यांमध्येच मिळत असे, मात्र आता स्वस्त सेडान आणि हॅचबॅकमध्ये देखील हे फीचर मिळते. या फीचरची खास गोष्ट म्हणजे पाणी पडताच वायपर्स ऑटोमॅटिक सुरू होतात. थोडेही पाणी पडताच हे आपोआप सुरू होत असल्याने, याचे ब्लेड देखील लवकर खराब होतात. त्यामुळे मॅन्युअली वायपर्सचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.