जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये आहे ‘या’ गोष्टींवर आहे बंदी


मुंबई : आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना रग्गड वेतनासोबतच कार्यालयातील वातावरण उत्तम रहावे यासाठी जगभरातील अनेक दिग्गज कंपन्या प्रयत्न करत असतात. त्यातच वेगवेगळ्या माध्यमातून या दिग्गज कंपन्यांमध्ये असलेले विचित्र नियम देखील आपल्या ऐकण्यात येत असतात किंवा व्हायरल होत असतात. या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांनी तणाव मुक्त काम करावे यासाठी वेगवेगळ्या सुखसुविधा उपलब्ध करुन देत असता. पण त्यातच यासाठी त्यांनी लागू केलेले नियम देखील तेवढे विचित्र असतात, ज्याचे कर्मचाऱ्यांना पालन करावे लागते. आम्ही तुम्हाला आज या दिग्गज कंपन्यांमध्ये लागू असलेल्या विचित्र नियमांबद्दल सांगणार आहोत.

ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या अॅमेझॉनमध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तयार करण्यास मनाई असल्याचे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी सांगितले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन जो कर्मचारी करतो त्याला सहा पानी मेमो दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अॅमेझॉनने आपल्या कंपनीत हवामान बदलावर चर्चा करण्यास मनाई केली असल्याचे वृत्त होते.

मायक्रोसॉफ्टमध्ये गुगल डॉक्स वापरण्यावर थेट बंदी नाही. पण, हे अॅप जो कर्मचारी वापरतो त्याला ‘व्यावसायिक कारण’ देत हे अॅप का वापरत असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागते. या जाचात अडकण्यापेक्षा कर्मचारी आता गुगल डॉक्सचा वापर करणेच टाळतात. तसचे मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना काम करत असताना शब्द, व्याकरण तपासणाऱ्या अॅपचा वापर करण्यावर बंदी आहे. त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टने स्लॅक अॅपचे फ्री व्हर्जन वापरण्यास मनाई केली आहे.

आपणा भारतीयांचे राजकारण आणि क्रिकेट हे आवडते विषय. यावर भारतीय म्हणून सर्वाधिकाराने बोलू शकतो. ऑफिसामध्ये राजकारणावर चर्चा होतच असतात. पण, मागील वर्षापासून ऑफिसमध्ये राजकीय गप्पा, वादविवाद करण्यास गुगलने बंदी घातली आहे. ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते काम करावे आणि कामाच्या बाबतीत काही वादविवाद करण्यास हरकत नसल्याचेही गुगलने म्हटले आहे.

सध्याच्या तरुणाईमध्ये आयफोन हा स्टेट्स सिम्बॉल मानला जातो. पण, आयफोन वापरण्यास फेसबुकच्या ऑफिसमध्ये मनाई आहे. ही बंदी पूर्णपणे अधिकृत नाही. काहींच्या मते ही बंदी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ टीम कुक यांच्यात वाद असल्यामुळे आहे. पण, हा दावा कंपनीने अधिकृतपणे सांगताना फेटाळला. फेसबुकने म्हटले की, आमच्या कंपनीतील कर्मचारी, अधिकारी हे अॅण्ड्रॉइड फोन वापरतात. अॅण्ड्रॉइड हे जगातील सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम असल्याचे म्हटले आहे.

एसडी कार्ड, पेन ड्राइव्ह वापरण्यास आयबीएम कंपनीमध्ये बंदी आहे. याची माहिती आयबीएमने २०१८ मध्ये दिली होती.

ई-टॅक्सीमध्ये अग्रेसर असलेल्या उबर कंपनीमधील कर्मचाऱ्यांना टेलिग्राम अॅप वापरण्यास मनाई आहे. याची माहिती काही वर्षाआधी उबरच्या सीईओंनी दिली होती.

कर्मचाऱ्यांना ब्लाइंड अॅप वापरण्यास टेस्ला कंपनीने बंदी घातली आहे. कर्मचारी या अॅपच्या माध्यमातून कंपनीबाबत चर्चा करत असल्यामुळे ही बंदी घालण्यात आली.

Leave a Comment