सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली निर्भयाच्या आणखी एका दोषीची याचिका


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज २०१२ च्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातली पवन कुमार गुप्ता या दोषीची याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने या याचिकेत जेव्हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होतो त्यामुळे फाशी देऊ नये अशी मागणी केली होती. हा मुद्दा दिल्ली न्यायालयाने दुर्लक्षित केल्याचा उल्लखेही याचिकेत नमूद करण्यात आला होता, पण ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या मुद्द्यामध्ये काहीही नवीन नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

पवनकुमार गुप्ताने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात गुन्ह्याच्या वेळी आपण अल्पवयीन होतो अशी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेत या याचिकेला काहीही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येईल असा आदेश दिल्ली न्यायालयाने नव्याने जारी केला आहे. याआधी त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले होते.

Leave a Comment