सैफचे खळबळजनक वक्तव्य; ‘तान्हाजी..’मध्ये दाखवलेला इतिहास खरा नाही


या महिन्याच्या 10 तारखेला शिवाजी महाराजाचा इतिहास सांगणारा तान्हाजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीज झाल्यानंतर तान्हाजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला आहे. अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला तानाजी चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत.

बॉक्स ऑफिसवर तान्हाजी चित्रपट चांगली कमाई करत असतानाच अभिनेता सैफ अली खानने या चित्रपटाबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. तान्हाजी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असतानाच सैफने चित्रपटाबाबत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर तान्हाजीच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सैफ अली खानने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तान्हाजी चित्रपटासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला इतिहास अर्धवट असून तो चुकीचा आहे. मी चित्रपटाचे कथानक वाचल्यानंतर भूमिकेच्या प्रेमात पडल्यामुळे त्यावर मी ठाम मत मांडू शकलो नाही. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असताना मला काही गोष्टी खटकत होत्या पण मला भूमिका सोडायची नसल्यामुळे मी काही बोलू शकलो नाही.

सैफ अली खानने एवढ्या दिवसांनंतर आपले मौन सोडले, पण त्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या प्रश्नापासून सैफ अली खानने गेल्या काहीदिवसांपासून मौन पाळले होते. त्याचं उत्तर त्याने एका मुलाखतीमध्ये दिले आहे.

Leave a Comment