विद्यार्थ्यांसाठी थेट रेल्वेच्या डब्ब्यांनाच बनविण्यात आले क्लासरूम

कर्नाटकच्या म्हैसूर शहरातील अशोकापुरम येथील रेल्वे कॉलनीमध्ये असलेल्या प्रायमेरी शाळेत रेल्वेने दोन जुन्या डब्ब्यांना रंगीबेरंगी वर्गाचे स्वरूप दिले आहे. जेणेकरून लहान मुलांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. या डब्ब्यांना नाली-काली असे नाव देण्यात आले आहे. कन्नड भाषेत या शब्दांचा अर्थ शिकण्याचा आनंद असा होतो. या दोन्ही डब्ब्यांमध्ये पाणी, वीज व स्वच्छतेची संपुर्ण काळजी घेण्यात आलेली आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या डब्ब्यांना क्लासरूममध्ये बदलण्याचा उद्देश आजुबाजूच्या मुलांना शिकण्यासाठी एक चांगली व सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हा होता. एका डब्ब्यात चौथी व पाचवीचा वर्ग भरतो. यामध्ये चार्ट आणि कलाकृती देखील काढल्या आहेत. दुसऱ्या डब्ब्याचा वापर हॉल म्हणून केला जातो.

डब्ब्यांना केवळ आतूनच नाही तर बाहेरून देखील ग्रीन एन्वायरमेंट आणि एज्युकेशन थीम अंतर्गत रंगवण्यात आले आहे. यावर जलचक्र आणि सौरमंडळ काढण्यात आलेले आहे. मुलांच्या गरजेनुसार, दोन्ही डब्ब्यात बायोटॉयलेट देखील आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा सुजाता सिंह यांनी या वर्गांचे उद्घाटन केले. वीज उपलब्ध करून देण्यासाठी एक सब स्टेशन देखील तयार करण्यात आलेले आहे.

Leave a Comment