काश्मिरी युवकाने चक्क बर्फापासून बनवली स्पोर्ट्स कार

जम्मू-काश्मिरमध्ये थंडाची कडाका वाढला असून, रस्त्यांवर बर्फ साचला आहे. याच बर्फापासून जुबैर अहमद या काश्मिरी युवकाने कमाल करून दाखवली आहे. बडगामच्या जुबैरने चक्क बर्फापासून स्पोर्ट्स कारची कलाकृती तयार केली आहे. रस्त्याच्या कडेला बर्फापासून तयार केलेल्या या स्पोर्ट्स कारने सर्वांचे लक्ष आकर्षित केले आहे.

जुबैरला ही कार बनविण्यासाठी 2 दिवस लागले. या व्हिडीओमध्ये जुबैर आपल्या या खास स्पोर्ट्स कारला फायनल टच देत आहे. त्याने याला काही रंग देखील दिले आहेत. या कारचे डिझाईन देखील आकर्षक आहे.

ही कार आकर्षणाचे केंद्र झाली आहे. लांबून लोक या कारसोबत सेल्फी काढण्यासाठी येत आहेत.

जुबैर अहमदला आइस आर्टिस्ट बनायचे आहे. त्याने या आधी बर्फापासून हॅलिकॉप्टर, अस्वल, बाइक, ट्रेन सारख्या कलाकृती बनवल्या आहेत.

Leave a Comment