भारतात इलेक्ट्रिक रिक्षा लाँच करणार अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस हे काही दिवसांपुर्वीच भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भारतात 7,100 कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याची देखील घोषणा केली होती. आता जेफ बेझॉस यांनी ट्विट करत भारतात इलेक्ट्रिक रिक्षा लाँच करणार असल्याचे सांगितले आहे.

बेझॉस भारतात अ‍ॅमेझॉनचा इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा लाँच करणार आहे. ही रिक्षा पुर्णपणे इलेक्ट्रिक असेल व यामुळे यातून शून्य कार्बन उत्सर्जन होईल.

बेझॉस यांनी ट्विट केले की, हेय, इंडिया. आम्ही लवकरच भारतात इलेक्ट्क डिलिव्हरी रिक्षा सादर करणार आहोत. संपुर्णपणे इलेक्ट्रिक व शून्य कार्बन. या सोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बेझॉस स्वतः रिक्षा चालवताना दिसत आहेत. हवामान बदलाविषयी उचलण्यात आलेले  अ‍ॅमेझॉनचे हे एक पाऊल आहे.

Leave a Comment