भाजपाध्यक्ष पदाची माळ अखेर जे.पी. नड्डांच्या गळ्यात


नवी दिल्ली: जगत प्रकाश नड्डा यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या नावाची घोषणा भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी केली.

पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवल्यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असे सांगण्यात येत होते. गृहमंत्रीपदाची सूत्रे अमित शहा यांनी स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. नड्डांची ओळख लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते अशी आहे.

Leave a Comment