कायदा पदवीधरांसाठी सैन्यात नोकरीची संधी

भारतीय सैन्याने जज एडवोकेट जनरल (जेएजी) शाखेसाठी कायदा पदवीधरांकडून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. सैन्याने अविवाहित कायदा पदवीधरांकडून शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या ग्रँटसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत 8 जागांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी आहे.

शैक्षणिक योग्यता –

इच्छुक उमेदवार हा 55 टक्के गुणांसह कायदा पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवार बार काउंसिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी करण्यासाठी योग्य असणे गरजेचे आहे.

वयाची अट –

इच्छुक उमेदवाराचे वय हे 1 जुलै 2020 ला 21 ते 27 वर्ष असणे गरजेचे आहे.

निवड –

उमेदवारांची निवड ही योग्यता, मेरिट आणि पदांच्या संख्येच्या आधारावर केली जाईल. निवड झाल्यानंतर उमेदवारांच्या नियुक्तीच्या आधी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षण दिले जाईल. अकादमीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 49 आठवडे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना डिफेंस मॅनेजमेंट अँड स्ट्रेटजिक स्टडिजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा दिला जाईल. कमिशन केल्यानंतर उमेदवारांना 6 महिने प्रोबेशन वर ठेवले जाईल.

अर्ज –

इच्छुक उमेदवार अधिक माहिती व अर्जासाठी सैन्याची अधिकृत वेबसाईट  joinindianarmy.nic.in ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी आहे.

Leave a Comment