नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा फर्स्टलूक रिलीज


मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘झुंड’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा अतिशय दमदार असे हे पहिले पोस्टर कलाविश्वात अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

चित्रपटाच्या पोस्टवर नागराज पोपटराव मंजुळे असे नाव लिहिण्यात आले आहे. ज्याच्या मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाशी ही दोन तगडी नावे जोडल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.


बिग बी हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘झुंड’ हा प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘स्लम सॉकर’ची सुरुवात ज्यांनी केली होती.

या चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ज्यांनी ओढ निर्माण केली. नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कलाविश्वातील महानायकासोबत काम करत आहे. आणखी एका कारणामुळेही हा चित्रपट महत्त्वाचा आहे, कारण नागराज मंजुळे ‘झुंड’च्या निमित्ताने हिंदी कलाविश्वातही पदार्पण करत आहे.

Leave a Comment