द्वितीय विश्वयुद्धानंतर बर्लिन शहराची एक विचित्र स्थिती निर्माण झाली होती. हे शहर एखाद्या बेटाप्रमाणे झाले होते, ज्यावर 4 देशांचे राज्य होते. प्रत्येक देशाने आपआपल्या परीने या शहराला सेक्टरमध्ये विभागले होते. हे देश होते – सोव्हियत संघ, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स.
वर्ष 1948 मध्ये एक वेगळा देश पश्चिम जर्मनी अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र स्टालिनला याचा विरोध होता. स्टालिनने याचा विरोध म्हणून त्याच्या सेक्टरशी लागणाऱ्या पश्चिम बर्लिनच्या भागाला पश्चिम जर्मनीपासून तोडले. मात्र 13 ऑगस्ट 1961 ला सर्वकाही बदलले.

पुर्व जर्मनीच्या सीमेवर सीमा पोलीस आणि सशस्त्र दल सोव्हियतच्या सीमेवर तैनात करण्यात आले. तर दुसरीकडे अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि पश्चिम बर्लिनचे पोलीस होते. पुर्व जर्मनीच्या बाजूला तार आणि काँक्रिटचे खांब उभे करण्यास सुरूवात झाली. ही बर्लिनची भिंत होती. पुर्व जर्मनीतून पश्चिमेकडे होणाऱ्या स्थलांतर करणाऱ्यांचा देखील हा मुद्दा होता. पूर्व जर्मनीतील प्रत्येकी सहावी व्यक्ती पश्चिम जर्मनीमध्ये आली होती. प्रशासन देखील पुर्व जर्मनी सोडणाऱ्यांना थांबवण्यास अपयशी ठरत होते.
बर्लिनच्या चारही देशांमध्ये एकमत झाले होते की, शहरामध्ये त्यांच्या नियंत्रणाखालील सीमा खुल्या ठेवण्यात याव्यात. मे 1960 ला पूर्व जर्मनीच्या गुप्त पोलिसांचे देखील गठन झाले. मात्र ते देखील स्थलांतर करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी झाले.

जून 1961 मध्ये सोव्हियत संघाचे निकिता ख्रुश्चेव आणि अमेरिकन राष्ट्रपती कॅनेडी यांची भेट झाली. या भेटीनंतर सोव्हियत संघाने बर्लिनची भिंत बांधण्यास परवानगी दिली.

भिंत बांधण्याचा निर्णय देखील गुप्त ठेवण्यात आला होता. जेणेकरून पुर्व जर्मनी सोडण्याचा विचार करणाऱ्यांमध्ये भिती निर्माण होऊ नये. सोव्हियत संघाने बाकीच्या देशांना स्पष्ट केले की, शांती करारास तयार व्हा अथवा पश्चिम बर्लिन खाली करा. त्यामुळे शांती करारांतर्गत पुर्व जर्मनीला एक वेगळा देश म्हणून मान्यता देण्यात आली व त्यातूनच जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिकची स्थापना झाली.

सार्वभौमत्तव मिळताच सोव्हियतने पुर्व जर्मनीला पश्चिम बर्लिनपासून ते पश्चिम जर्मनीला जोडणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण मिळवले. यामध्ये रस्ते, रेल्वे आण हवाई वाहतूक सर्वांचा समावेश होता. सोव्हियतने पुर्व जर्मनीला पश्चिम जर्मनीपासून वेगळे करण्याचा घाट घातला होता पुर्व जर्मनीतून अनेक लोक पश्चिम जर्मनीत जात होत. हे थांबवण्यासाठी सोव्हियत संघाने पाऊल उचलले. यानंतर ऑपरेशन पिंकची सुरूवात झाली. अनेक अधिकाऱ्यांना या योजनेची माहिती देण्यात आली नव्हती. केवळ 60 जणांना याची माहिती होती. अखेर 13 ऑगस्ट 1961 ला बर्लिनची भिंत उभारण्याची काम सुरू झाले.