फेसबुकमुळे तब्बल 48 वर्षांनी या व्यक्तीची झाली कुटुंबियांशी भेट

फेसबुकच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे एक 78 वर्षीय व्यक्तीची तब्बल 4 दशकांनंतर आपल्या कुटुंबाशी भेट झाली आहे. एका व्यावसायिक दौऱ्यावेळी ही व्यक्ती गायब झाली होती.

बांगलादेशच्या सिलकट शहरातील बजग्राम येथे राहणारे हबीपूर रहमान 30 वर्षांचे असताना एका दौऱ्यावेळी हरवले होते. गायब झाल्यानंतर 48 वर्षांनी त्यांच्या कुटुंबाला ते शहरातील एमएजो उस्मानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सापडले.

अमेरिकेत राहणारी त्यांची सून 17 जानेवारीला फेसबुकवर एक व्हिडीओ पाहत होती. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या बाजूच्या रुग्णासाठी आर्थिक मदत मागत होता. शंका आल्यावर तिने हा व्हिडीओ आपल्या पतीला देखील पाठवला. महिलेच्या पतीने त्वरित हा व्हिडीओ सिलहटमध्ये राहणाऱ्या आपल्या भावाला पाठवून तो रुग्ण कोण आहे हे जाणून घेण्यास सांगितले. अखेर तपासानंतर ते त्यांचे वडिल असल्याचे समोर आले.

रहमान यांचा लोखंडाचे रॉड व सिमेंटचा व्यवसाय होता. त्यांना 4 मुले आहेत. वर्ष 2000 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचा मुलगा जलालुद्दीनने सांगितले की, मला आठवते की आई व नातेवाईकांनी अनेकवर्ष त्यांचा शोध घेतला. मात्र अखेर त्यांना आशा सोडून दिली.

रहमान मागील 25 वर्षांपासून सिलहटच्या मौलवी बाजारात राहत होते. जेथे रजिया बेगम नावाची महिला त्यांची काळजी घेत होती. बेगमने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला रहमान 1995 मध्ये हजरत शहाबुद्दीन दरगाह येथे भेटले होते.

काही दिवसांपुर्वीच बेडवरून पडल्याने त्यांचा हात तुटला होता. डॉक्टरांना रहमान यांचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले होते. मात्र उपचारासाठी पैसे नव्हते. त्याचवेळी हॉस्पिटलमधील एका रुग्णाने आर्थिक मदत मागतानाचा व्हिडीओ बनवला व शेअर केला होता.

 

Leave a Comment