गाडीतून जळती सिगरेट बाहेर फेकल्यास भरावा लागणार भला मोठा दंड

ऑस्ट्रेलियामध्ये आग लागण्याची मोठी समस्या आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यामुळे 50 कोटींपेक्षा अधिक प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. 25 पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. ज्यामध्ये अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

या भयंकर आगीनंतर ऑस्ट्रेलियाने वाहन चालकांसाठी एक खास नियम बनवला आहे. या अंतर्गत कारमधून जळती सिगरेट बाहेर फेकल्यास चालकाला 11 हजार डॉलर ( जवळपास 5 लाख रुपये) दंड भरावा लागेल.

या आठवड्यापासून  हा नवीन नियम ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये लागू होईल.  हा नियम केवळ कार चालकांसाठीच नाही तर कारमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील आहे. जर प्रवाशांनी असे केले तर त्यांना 1,320 डॉलर दंड भरावा लागेल.

खराब हवामानात अनेक ‘टोटल फायर बॅन’ हा नियम लागू होता. अशावेळेस कोणी गाडीतून जळती सिगरेट फेकल्यास त्याच्याकडून दंड वसूल केला जाईल. टोटल फायर बॅन नसल्यावर नियम तोडल्यास किती दंड वसूल केला जाईल, हे अद्याप स्पष्ट नाही.

2019 मध्ये न्यू साउथ वेल्समध्ये 200 पेक्षा अधिक लोकांना कारमधून जळती सिगरेट फेकल्याने पकडण्यात आले होते. दंडाव्यतरिक्त, गुन्हेगारांच्या लायसन्सवर 10 डिमेरिट प्वाइंट देण्यात येतील. फायर बॅन नसेल तेव्हा हे प्वाइंट 5 असतील.

Leave a Comment