या राज्यांमधील 10 शहरांमध्ये एअरटेलची 3जी सेवा बंद

टेलिकॉम नेटवर्क एअरटेलने मागील वर्षी कोलकातामधील आपली 3जी सेवा बंद केली होती. एअरटेलने सांगितले होते की, आता शहरात केवळ 4जी सेवा उपलब्ध होईल. एअरटेल 4जी नेटवर्कला अधिक मजबूत करण्यासाठी 3जी साठी वापरण्यात येणाऱ्या 900 मेगाहर्ट्ज बँड स्पेक्ट्रमचा वापर 4जी नेटवर्कसाठी करणार आहे.

कोलकातानंतर आता एअरटेलने 3जी सेवा महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, पंजाब, हरियाणा आणि गुजरातमधील अनेक शहरांमध्ये देखील बंद केली आहे. ज्या भागांमध्ये एअरटेलने 3जी सेवा बंद केली आहे, त्या ग्राहकांना आधीच याबाबत सुचना देण्यात आली होती व त्यांना फोन अथवा सिम 4जीमध्ये अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. ज्यांनी फोन अथवा सिम अपडेट केले नाही त्यांना वॉइस सर्व्हिस मिळेल.

मार्च 2020 मध्ये संपुर्ण देशामध्ये एअरटेलची 3जी सेवा बंद होणार आहे. एअरटेलने हे देखील सांगितले आहे की, फीचर फोनसाठी 2जी सेवा सुरू राहील.

Leave a Comment