तब्बल 88 वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय होणार पोलिसांचे आधुनिक अश्वदल


मुंबई: तब्बल 88 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईतील खूप जुने असे पोलिसांचे अश्वदल सुरु होणार आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नव्याने सुरु होणारे हे अश्वदल आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्या समोर येणार आहे. आता पुन्हा एकदा एका दलाची भर मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये पडणार असल्याने पोलिसांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हे युनिट 26 जानेवारीला म्हणजेच प्रजाकसत्ताक दिनापासून सुरु होणार आहे. 30 घोडे मुंबई पोलिसांच्या या युनिटमध्ये असणार आहेत.

बृहन्मुंबईच्या या माउंटेड पोलीस युनिटमध्ये 1 सब इन्सपेक्टर, 1 एएसआय, 4 हेडकॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. त्याशिवाय याचा वापर जमावावर नियंत्रण करण्यासाठीही केला जाणार आहे. अश्वदलात असणाऱ्या पोलिसांना / घोडेस्वारांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. यापैकी समुद्र किनारी दोन घोडे असतील. या घोडेस्वारांना बॉडी कॅमेरा दिला जाणार आहे. शिवाय मरोळमध्ये पागा तयार केल्या जाणार आहेत. सध्या दादरच्या शिवाजी पार्क येथे याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.

26 जानेवारीच्या शिवाजी पार्क येथील परेडमध्ये या दलातील 11 घोडे असतील. या घोड्यांची 4-5 लाखांना खरेदी करण्यात आली आहे. या दलाचे आर. टी. निर्मल हे प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत. यासाठी सरकारने आतापर्यंत 13 घोडे खरेदी केले आहेत, तर 17 घोड्यांची खरेदी येत्या काळात केली जाणार आहे.

Leave a Comment