मृत्यूच्या 7 वर्षांनंतर वॉकरच्या गाड्यांचा एवढ्या कोटींना लिलाव

फास्ट अँड फ्यूरियस चित्रपट फ्रेंचाइजीमुळे चर्चेत आलेला हॉलिवूडचा दिवंगत अभिनेता पॉल वॉकरच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी  त्याच्या 18 कार आणि 3 मोटारसायकलचा लिलाव पार पडला. या 21 वाहनांसाठी 2.33 मिलियन डॉलर्सची (16.50 कोटी रुपये) बोली लागली. याद्वारे जमा झालेली रक्कम वॉकरची मुलगी मॅडोच्या एका ट्रस्टला दिली जाईल. 2013 मध्ये कारला धडकून झालेल्या अपघातात वॉकरचे निधन झाले होते. पॉल वॉकरला गाड्यांचे वेड होते.

हा लिलाव एक आठवडे सुरू होता. या कारमध्ये अल्पाइन व्हाइट 1995, बीएमडब्ल्यू एम -3 सारख्या कार होत्या. याची सर्वाधिक किंमत 2 कोटी 73 लाख रुपये होती. निसान 370-झेडवर सर्वाधिक बोली लागली. ही कार फास्ट फाइव्हमध्ये दिसली होती. ही कार 75 लाख रुपयांना विकली गेली. फोर्ड बॉस 302-एस कार 68 लाखांना विकली गेली.

पॉल वॉकरच्या या गाड्या खरेदी करण्यासाठी अनेक लोक उपस्थित होते. या गाड्यांवर मोठी बोली लागली.

Leave a Comment