सॅमसंग गॅलेक्सी एस २० अल्ट्रा १६ जीबी रॅम सह येणार


कोरियन जायंट इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी एस २० सिरीज मधील ३ स्मार्टफोन ११ फेब्रुवारी रोजी लाँच होत असल्याचे संकेत दिले असून या एस २० सिरीज मधील अल्ट्रा व एस २० प्लस हे खास फोन आहेत असे नवीन लिक झालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. या फोन्स संदर्भात पूर्वीही अनेक लिक्स आले आहेत मात्र नव्या लिक्स मध्ये या फोन्सची सर्व फिचर उघड केली गेली आहेत. हे सर्व फोन मार्च मध्ये विक्रीसाठी बाजारात येतील असे समजते.

एस २० अल्ट्रासाठी ६.९ इंची इन्फिनिटी झिरो डायनॅमिक अमोलेड डिस्प्ले सेंट्रली अलाईड पंचहोल डिस्प्ले सह दिला गेला असून त्याला १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असेल. शिवाय १०८ एमपीचा प्रायमरी सेन्सर, ४८ एमपी टेलिफोटो, १२ एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि टीओएफ सेन्सर असेल. १० एक्स ऑप्टिकल झूम आणि १०० एक्स डिजिटल झूम सपोर्ट असेल.

एस २० प्लस साठी ६.७ इंची डिस्प्ले, १२ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, रिअरला ६४ एमपीचा कॅमेरा, १२ एमपी वाईड अँगल आणि १० एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल तर सर्वात कमी किमतीच्या एस २० साठी ६.२ इंची डिस्प्ले, १२८ जीबी स्टोरेज आणि कॅमेरा सेटअप एस २० प्लस प्रमाणे असेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment