मिशेलिन आणतेय पंक्चर न होणारे टायर


रस्त्यात मध्येच कारचे टायर पंक्चर होण्याच्या कटकटीचा अनुभव अनेकांच्या गाठीशी असेल. कधी जवळपास पंक्चर काढणारे मेकॅनिक मिळत नाहीत तर कधी स्वतःलाच टायर बदलण्याची वेळ अनेकांनी अनुभवली असेल. या समस्येवर आता लवकरच उपाय येत असून मिशेलिन या प्रसिध्द टायर कंपनीने अमेरिकन ऑटो दिग्गज जनरल मोटर्सच्या सहकार्यातून कधीच पंक्चर न होणारे टायर बनविण्याचे काम सुरु केले आहे.

रस्त्यात अनेकदा काचांचे तुकडे, लोखंडी खिळे अथवा अन्य टोकदार वस्तू टायर मध्ये घुसतात आणि टायर पंक्चर होते. मिशेलिन तयार करत असलेल्या टायरवर या कशाचाच परिणाम होणार नाहीच पण हे टायर ट्यूबलेस असेल आणि त्यात हवा भरण्याची गरज भासणार नही.

मिशेलिन uptis म्हणजे युनिक पंक्चरप्रूफ टायर सिस्टीम नावाने एक खास तंत्र विकसित करत आहे. या टायरचे डिझाईन थोडे क्लिष्ट आहे. हे टायर अश्या प्रकारे बनविले जात आहे की त्यात जणू स्प्रिंग बसविली गेली आहे. त्यामुळे ट्यूबची गरज राहणार नाहीच पण तरीही टायर ट्यूब टायर प्रमाणे लवचिक असेल. हे टायर तयार होण्यास ६ महिने लागतील असे सांगितले जात असून वर्षभरात ते बाजारात विक्रीसाठी येईल. या टायर साठी नेहमीच्या टायर पेक्षा थोडे अधिक पैसे ग्राहकांना मोजावे लागतील असे समजते.

Leave a Comment