किंग एडवर्ड ८ च्या अतिदुर्मिळ नाण्याला १३ लाख डॉलर्स किंमत


फोटो सौजन्य नई दुनिया
ब्रिटनचा किंग एडवर्ड आठवा याने राजगादीचा त्याग करण्यापूर्वीची प्रतिमा असलेल्या एका अतिदुर्मिळ सोनाच्या नाण्याला विक्रमी १३ लाख डॉलर्स किंमत मिळाली आहे. जगात जी दुर्मिळ नाणी आहेत त्यातील हे एक नाणे आहे. ब्रिटीश राजवंश नाणे विक्रीतील सर्वाधिक किमतीचे रेकॉर्ड या नाण्याने नोंदविले आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीयचे काका असलेले किंग एडवर्ड ८ यांनी अमेरिकन विधवा महिलेशी लग्न करण्यासाठी राजगादीचा त्याग केला होता. राजगादी सोडण्यापूर्वी या राजाची प्रतिमा असलेले सोन्याचे नाणे बनविले गेले होते. या नाण्याचा खरेदीदार एक खासगी संग्राहक असून त्याने नाव गुप्त ठेवले आहे. त्याने असे नाणे मिळणे म्हणजे आयुष्यातील दुर्लभ संधी असल्याचे सांगितले आहे.

शाही टांकसाळ संग्रह सेवा प्रमुख रिकेला मोर्टन यांच्या म्हणण्यानुसार या नाण्याला इतकी किंमत मिळाली यात काही आश्चर्य नाही कारण हे नाणे खरोखरच अतिदुर्मिळ आहे. २२ कॅरेट सोन्याचे हे नाणे लोकांसाठी कधीच जारी केले गेले नव्हते. या नाण्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. किंग एडवर्ड दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या वेलीस सिप्सन या अमेरिकन महिलेच्या प्रेमात पडला होता पण ती घटस्फोटीत आणि नंतर विधवा बनल्याने त्याला तिच्याशी लग्न करता येत नव्हते. राजगादी सोडली तर हे लग्न शक्य होणार होते म्हणून या राजाने राजगादी सोडली होती.

वयाच्या ४२ व्या वर्षी २० जानेवारी ३६ ला किंग एडवर्ड ब्रिटीश गादीवर आला आणि ११ महिन्यात त्याने वेलीस शी लग्न करण्यासाठी राजेपदाचा त्याग केला होता. त्याचा मृत्यू १९७७ मध्ये झाला होता तर त्याची पत्नी वेलीस १९८६ मध्ये मरण पावली.

Leave a Comment