अन्य पर्याय मिळाल्यास राजकारण सोडण्याची तयारी- नितीन गडकरी


फोटो सौजन्य झी न्यूज
मी माझ्या व्हिजन प्रमाणे काम करतो, मला सरकारची त्यासाठी गरजनाही. राजकारणास चांगला पर्याय मिळाला तर राजकारण सोडण्यास तयार आहे असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. ग्रामीण भारत विकास या कार्यक्रमात एकाच मंचावर बॉलीवूड अभिनेता नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांनी आपले विचार मांडले आणि नितीन गडकरी यांनी या संदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. एक पहल अभिनव भारत की ओर असे या कार्यक्रमाचे नाव होते.

यावेळी बोलताना गडकरी यांनी नानाचे कौतुक केले. ते म्हणाले, नानाचा अभिनय, त्याचे विचार आणि स्पष्टवक्तेपण यांचा माझ्यावर प्रभाव आहे. मीही ५० ते ८० टक्के सामाजिक काम करतो आणि त्यासाठी सरकारची गरज नही. बायोटेक्नोलॉजिच्या दिशेने केलेली कामे सांगताना गडकरी यांनी ६ वर्षात ६ जिल्हे डिझेलमुक्त करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले शेतकऱ्याच्या हातात पैसा आल्याशिवाय विकास शक्य नाही. पंजाब हरियाणातील शेतकरी पक्क्या घरात राहतात, स्वतःच्या ट्रॅक्टर वर बसून कोक पितात आणि आमचा विदर्भातील शेतकरी अर्धा कप चहा पितो. शेतकऱ्यांची नुसती कर्जे माफ करून उपयोग नाही तर शेतकरी समृध्द कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

नाना यावेळी बोलताना म्हणाला, मी खेड्यातून आलोय, जमिनीवर बसून शिकलोय आणि मला फार इंग्रजी येत नाही म्हणून हॉलीवूड मध्ये काम करू शकत नाही. पण मला एक नक्की माहिती आहे आपण आपल्या गरजा कमी केल्या तर आणखी एका गरीब बांधवाला आपण नक्कीच मदतीचा हात देऊ शकतो.

Leave a Comment