पाकिस्तानात जन्मलेली महिला भारतात झाली सरपंच


जयपूरः सध्या देशभरात नागरिकत्व संशोधन कायद्यावरून वाद-विवाद सुरू असताना भारतात पाकिस्तानमध्ये जन्म झालेली एक महिला सरपंच झाली आहे. पाकमध्ये जन्म झालेल्या नीता कंवर टोंक या सरपंच बनल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नटवारा ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या नीता कंवर यांचा जन्म झाला होता. पण, त्या २००१ साली जोधपूरला आल्या होत्या. त्यांना १९ वर्षानंतर भारताचे नागरिकत्व मिळाले होते.

सिंधच्या मीरपूर-खासहून नीता आपली मोठी बहिण अंजना सोढा यांच्यासोबत जोधपूरला आल्या होत्या. नीता यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व मिळाल्यानंतर १७ जानेवारी रोजी नटवारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. नीता यांचा निवडणूक निकालानंतर विजय झाला. १०३५ मते नीता यांना मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सोनू देवी यांचा त्यांनी ३६२ मतांनी पराभव केला. त्यांनी या विजयानंतर आनंद व्यक्त केला. मला गावची सरपंच महिला बनल्याने आनंद झाला आहे. या गावची सून आहे. मला कुटुंबातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. या गावची मी सरपंच बनेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते, असे विजायनंतर नीता यांनी म्हटले आहे.

नीता यांनी भारतात आल्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यांचा अर्ज चार वेळा नामंजूर करण्यात आला होता. त्यांचा पाचव्यांदा अर्ज स्वीकारला गेला. मी टोंकमधील नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणारी पहिली महिला आहे. मला नागरिकत्व मिळवण्यासाठी खूप कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्याचेही नीता यांनी सांगितले. अनेकदा तर जयपूरपर्यंत जावे लागले. मला महिला सबलीकरण आणि चांगल्या शिक्षणासाठी काम करायचे असल्याचेही नीता यांनी सांगितले.

Leave a Comment