आयओएस की अँड्राईड : कोणती ऑपरेटिंग सिस्टम अधिक सुरक्षित ?

सध्या स्मार्टफोन बाजारात केवळ दोनच ऑपरेटिंग सिस्टम सुरू आहेत. एक म्हणजे अ‍ॅपलची आयओएस आणि दुसरे अँड्राईड. अँड्राईड युजर्सची संख्या आयओएसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अँड्राईड आणि आयओएसमध्ये चांगले व सुरक्षित कोणते आहे ? असा प्रश्न नेहमी समोर येतो.

परफॉर्मेंस –

परफॉर्मेंसबद्दल सांगायचे तर आयफोनचा परफॉर्मेंस सर्वोत्तम आहे. मात्र आता चांगले परफॉर्मेंस असणारे अँड्राईड स्मार्टफोन देखील बाजारात आले आहेत. आयफोनची हँग होण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र अँड्राईड फोन काही दिवसानंतर हँग होण्यास सुरूवात होते. आयफोनचे प्रोसेसर आणि ग्राफिक्स देखील अनेक बाबतीत अँड्राईडच्या तुलनेत जलद आहे.

सॉफ्टवेअर –

सॉफ्टवेअरबद्दल सांगायचे तर अ‍ॅपल 5 वर्ष जुन्या आयफोनसाठी देखील अपडेट जारी करते. मात्र अँड्राईडमध्ये असे होत नाही. अँड्राईडमध्ये 2 वर्ष सॉफ्टवेअर अपडेट मिळते. आयओएस 13 सध्या सर्वात फास्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरमध्ये अ‍ॅप लाँच होण्याआधी त्याची तपासणी केली जाते. मात्र अँड्राईडसोबत असे होत नाही. त्यामुळे अँड्राईड फोनमध्ये मालवेअरची शक्यता अधिक असते.

प्रायव्हेसी आणि सिक्युरिटी –

अनेक दहशतवादी घटनांमध्ये देखील अ‍ॅपलने आरोपींचे आयफोन अनलॉक करण्यास नकार दिला होता. यावरूनच आयफोन युजर्सच्या प्रायव्हेसीची किती काळजी घेते, ते स्पष्ट होते. अ‍ॅपलची सिक्युरिटी अँड्राईच्या तुलनेत अधिक चांगली आहे. अनेक अँड्राईड फोनमधील फेस आयडी फोनद्वारे अनलॉक केल्याचे रिपोर्ट देखील समोर आले आहेत. मात्र आयफोनमध्ये असे होत नाही.

अँड्राईड आणि आयओएसच्या सिक्युरिटीमध्ये किती फरक ?

आयओएसच्या तुलनेत अँड्राईड अधिक ओपन आणि फ्लेसिकबल आहे. ज्यामुळे डेव्हलपर्स आणि युजर्सला अनेक फायदे मिळतात. मात्र व्हायरस आणि मालवेअरच्या बाबतीत अँड्राईड मागे पडते. आयफोनमध्ये युजर्सला त्वरित अपडेट मिळते, मात्र अँडाईडमध्ये असे होत नाही.

आयफोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यता किती ?

आयफोनमध्ये व्हायरस घुसण्याची शक्यता खूप कमी असते. शून्य असते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण अ‍ॅपल सर्व थर्ड पार्टी अ‍ॅपची तपासणी करते व नंतरच अ‍ॅप स्टोरमध्ये पब्लिश करते.

Leave a Comment