व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला लवकरच मिळणार हे धमाकेदार फीचर

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी एक खास फीचर लाँच करणार आहे. युजर्सला नवीन अपडेटमध्ये एनिमेटेड स्टिकर्स फीचर मिळू शकते. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये पाहण्यात आले आहे. कंपनीने अद्याप या फीचरबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

रिपोर्टनुसार, बीटा व्हर्जनवर सर्व युजर्सला हे फीचर सपोर्ट मिळाले आहे. स्टिकर्स पाठवण्यासाठी युजर्सला चॅट बॉक्स ओपन केल्यावर स्टिकर बटनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर युजर्सला स्टिकर्स पॅक अपडेट करण्याचा पर्याय मिळेल. या अपडेटनंतर युजर्सला एनिमेटेड स्टिकर्स मिळेल.

या व्यतरिक्ते गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप डिसअपेरिंग मेसेंज आणि डार्कमोड हे फीचर देखील टेस्टिंग करत असून, लवकरच अँड्राईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये हे फीचर पाहायला मिळेल.

Leave a Comment