काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर घाणेरडे चित्रपट पाहण्यासाठी


नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मागील अनेक दिवसांपासून अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. या ठिकाणी इंटरनेटवरही बंदी होती.पण इंटरनेटची सुविधा हळूहळू काही प्रमाणात सुरु होत आहे. नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना “घाणेरडे चित्रपट” पाहण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होत असल्याचा दावा केला आहे.

एकीकडे जम्मू काश्मीरमधील अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेट बंदीमुळे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडथळे येत आहेत. माहितीची देवाणघेवाण करण्यात माध्यमांनाही अडचणी येत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहारही करणे बंद आहे. असे असताना सारस्वत यांच्या या व्यक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

धीरूभाई अंबानी इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन अँड कम्यूनिकेशन टॅक्नॉलॉजीच्या वार्षिक दीक्षांत सोहळ्यात व्ही. के. सारस्वत बोलत होते. ते पुढे म्हणाले, सोशल मीडियाचा उपयोग करुन जम्मू काश्मीरमध्ये आग लावली जाते. तेथे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसेही इंटरनेटचा उपयोग करुन ते तेथे काय पाहतात? तेथे घाणेरडे चित्रपट पाहतात, त्याशिवाय काहीही करत नाही. जम्मू काश्मीरमध्ये ज्या नेत्यांना जायचे आहे त्यांना तेथे का जायचे आहे? दिल्लीतील रस्त्यावर जसे आंदोलन सुरु आहे तसेच काश्मीरमध्येही करायचे असल्याचा आरोप सारस्वत यांनी केला.

Leave a Comment