एकात्मतेचा संदेश देण्यासाठी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत धावत रचला विश्वविक्रम

राजस्थानच्या अजमेर येथे राहणारी अल्ट्रा रनर सुफिया खानने एक खास विश्वविक्रम केला आहे. तिने 87 दिवसात 4035 किमी अंतर धावत पुर्ण केले आहे. सूफियाने हे अंतर काश्मिर ते कन्याकुमारी असे धावून पुर्ण केले.

या मागे तिचा उद्देश होता की, देशातील 22 शहरांमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटून, त्यांना बंधुता, एकता, शांती आणि समानतेचा संदेश देणे. तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

https://www.facebook.com/sufiya.khan.714/posts/10212328265880478

सुफियाने सांगितले की, तिचे लक्ष्य 100 दिवसात हे अंतर पार करण्याचे होते. मात्र तिने ही कामगिरी 87 दिवसातच पुर्ण केली.

तिने सांगितले की, आपले मिशन रन फॉर होप दरम्यान मी ज्या ज्या शहरात गेले, तेथील लोकांनी माझे अभिवादन केले. माझ्यासोबत धावले देखील. सुफिया एका एअरलाइन कंपनीत कामाला होती. मात्र तिने ती नोकरी सोडली. जेणेकरून तिला धावण्यावर लक्ष देता येईल.

Leave a Comment