या कॉन्टॅक्ट लेंसद्वारे डोळ्यांनी पाहता येतील ह्रदयाचे ठोके

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील स्टार्टअप कंपनी मोजो व्हिजनने एक खास स्मार्ट कॉन्टॅक्ट लेंस तयार केली आहे. ही लेंस तुम्हाला वेळ, हवामानाचा अंदाज, कॅलेंडर आणि तुमच्या गरजेनुसार आजुबाजूच्या सुविधा सांगते. ही लेंस तुमचे लक्ष विचलित न करता तुम्हा योग्यवेळी सूचना देईल. ही लेंस सर्वांसाठी उपयोग आहे.

ही लेंस एखाद्या रोबोटिक डोळ्यांप्रमाणे काम करते. यामध्ये नाइट व्हिजनची सुविधा देखील आहे. याच्या वापरासाठी स्मार्टफोनची गरज नसून, यात बिल्ट-इन-डिस्प्ले आहे. जीपीएसद्वारे डोळ्यात लेंसपर्यंत सूचना आपोआप पोहचते. अंतिम चाचणीनंतर या वर्षाच्या अखेरपर्यंत याचे प्रोटोटाइप जारी केले जाईल.

मोजो व्हिजनचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर माइक वेमरने सांगितले की, ही कॉन्टॅक्ट लेंस डोळ्यांच्या पापण्यांच्या इशाऱ्यावर काम करेल. पापण्यांची हालचाल होताच जीपीएसद्वारे लेंसला सूचना मिळतात.

लेंस पापण्यांच्या गतीला ओळखते व त्यानुसारच काम करते. यामध्ये सेंसर आणि मायक्रोचीप देखील आहे. जे पापण्यांच्या वेगानुसार काम करते. यात लेंस झूम आणि झूम आउटची देखील सुविधा आहे.

धावताना व सायकल चालवताना ह्रदयाचे ठोके देखील तुम्ही डोळ्यासमोर पाहू शकाल. चालताना एखाद्या अनोळख्या गोष्टीची ओळख न पटल्यास कॉन्टॅक्ट लेंसद्वारे त्याची ओळख होईल.

या लेंसमध्ये ऑगमेंटेड रियालिटी (एआर) फीचर आहे. या तंत्रज्ञानामध्ये तुमच्या आजुबाजूच्या वातावरणाशी मिळते जुळते संगणकीकृत जग तयार होते. म्हणजेच तुमच्यासमोर एक आभासी जग तयार होते, जे पाहताना वास्तविक वाटते.

Leave a Comment