दिव्यांग मड्डारामला सचिनचे स्पेशल गिफ्ट

काही दिवसांपुर्वी दिव्यांग मड्डाराम कवासी याचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी या मुलाचे कौतूक केले होते. स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतूक केले होते. आता सचिनने त्याच्यासाठी एक खास गिफ्ट पाठवले आहे.

12 वर्षीय मड्डारामसाठी सचिनने एक क्रिकेट किट पाठवली आहे. यासोबतच त्याच्यासाठी एक पत्र देखील लिहिले आहे.

Image Credited – Bhaskar

पत्रात लिहिले आहे की, तू ज्या प्रमाणे या खेळाचा आनंद घेत आहेस ते पाहून चांगले वाटले. हे तुला व तुझ्या मित्रांसाठी माझ्याकडून एक प्रेमळ भेट. खेळत रहा.

बस्तर येथे राहणारा मड्डाराम सध्या व्हिलचेअर फायनल सामन्यासाठी रायपूरमध्ये आहे. यावेळी त्याला हे गिफ्ट मिळाले. तो म्हणाला की, मला विश्वासच बसत नाहीये. मला हे मिळाल्याचा खूप आनंद होत आहे.

Leave a Comment