पूजा बेदीच्या मुलीने केला नावात बदल


सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला ही बॉलिवूड पदार्पण करत आहे. यापूर्वी आलिया असे अलायाचे नाव होते. पण आता तिने हे नाव बदलून अलाया केले आहे. तिच्या नावात बदल झालेला सोशल मीडियावरही पाहायला मिळतो.

नाव बदलण्याच्या मागचे कारण अलायाने सांगितले आहे. चित्रपटसृष्टीत आधीच आलिया भट्टचे नाव सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिने स्थान मिळवल्यामुळे याच नावाने सुरुवात करण्यापेक्षा नाव बदलून करिअरची सुरुवात करण्यासाठी नावात बदल केला असल्याचे तिने म्हटले आहे.

‘जवानी जानेमन’ चित्रपटात अलायाची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बुचीही भूमिका आहे. ट्रेलरमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. अलायाच्या या चित्रपटाला आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment