ऑनलाईन विकले जाणारे हे द्रोण खाऊन जात आहेत भाव

आज अनेक गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. मात्र प्लास्टिक धोकादायक असल्याने त्याचा पर्याय म्हणून अनेक गोष्टी तयार करण्यात येत आहेत. प्लास्टिक आणि थर्माकॉलच्या आधी लोक पानांचा वापर करत असे. अनेक ठिकाणी समोसे, पाणीपुरी देखील याच पानांच्या द्रोणात दिली जाते. मात्र तुम्हाला याची किंमत माहिती आहे का ?

तुम्हाला कदाचित पानांच्या या पत्रावळी आणि द्रोणांची किंमत 1 ते 2 रुपये वाटत असेल.मात्र एक कंपनी तब्बल 100 रुपयांमध्ये या दोन्हींचे 8 पीस विकत आहे.

Image Credited – scoopwhoop

या कंपनीचे नाव Nicobar असून, ही एक प्रसिद्ध लाइफस्टाइल ब्रँड आहे. त्यांच्या साइटवर पानांपासून बनलेल्या 8 पत्रावळी 100 रुपयांना विकले जात आहे. म्हणजे एका पत्रावळीसाठी 13 रुपये मोजावे लागतील.

https://twitter.com/KharaabChai/status/1218435784677773313

ट्विटरवर याचा एक फोटो व्हायरल होत आहे. युजर्स यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

Leave a Comment