टेक कंपनी गुगलने आपल्या प्लॅटफॉर्मवर असे अनेक अॅप लाँच केले आहेत, ज्याचा युजर्सला खूप फायदा होतो. हे अॅप्स अगदी सुरक्षित असून, यामूळे युजर्सच्या डेटाला कोणतेही नुकसान पोहचत नाही. या अॅप्सच्या वापरामुळे युजर्सची अनेक कामे सोपी होतात. या अॅप्सविषयी जाणून घेऊया.

गुगल ओपिनियन रिवॉर्ड अॅप –
युजर्स या अॅपच्या द्वारे कोणत्याही सर्वेक्षणामध्ये भाग घेऊन लोकल गाइड बनून कमाई करू शकतात. ही कमाई युजर्सला क्रेडिट स्वरूपात मिळेल. या क्रेडिटद्वारे युजर्स गुगल संबंधित गोष्टी खरेदी करू शकतात.

गूगल किप अॅप –
गुगल किप रिमाइंडर अॅप म्हणून काम करतो. युजर्स या अॅपद्वारे महत्त्वाची कामे रिमाइंडर म्हणून सेट करू शकतात. यामुळे योग्यवेळी युजर्सला रिमाइंडर मिळेल.

गुगल ट्रिप्स अॅप –
युजर्स या अॅपमध्ये प्रवासासंबंधित माहिती ठेवू शकतात. हे अॅप युजर्सला प्रवासासंबंधित सल्ला देखील देईल. युजर्सला याद्वारे ट्रॅफिक संबंधित माहिती देखील मिळेल.

गुगल फिट अॅप –
युजर्स या अॅपद्वारे आपल्या फिटनेस एक्टिव्हिटीवर लक्ष ठेऊ शकतात. हा अॅप कोणत्या डिव्हाईसचे युजर्स वापरू शकतात.

गुगल क्लासरूम अॅप –
हा अॅप युजर्सला क्लासरूम सारखा अनुभव देते. या अॅपद्वारे युजर्स असाइनमेंट, होमवर्क आणि मार्गदर्शन आपल्या शिक्षकांकडून घेऊ शकतात. हे सर्व अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत.