7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान पार पडणाऱ्या ऑटो एक्स्पो 2020 मध्ये एमजी हेक्टर एक खास कार लाँच करणार आहे. ऑटो एक्स्पोमध्ये एमजी आपली फॅमिली इलेक्ट्रिक कार सादर करणार असून, ज्याची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असेल. एमजी ऑटो एक्स्पोमध्ये एकूण 14 कार सादर करण्याची शक्यता आहे. कंपनीने सांगितले की, पुढील 18 ते 24 महिन्यात भारतात 5 नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत.
कंपनीच्या दावा आहे की, त्यांच्या छोट्या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांपेक्षा कमी असेल. अद्याप या कारच्या नावाबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र टेस्टिंग दरम्यान कारचे फीचर्स लीक झाले होते. त्यानुसार याचे नाव एमजी ई100 असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये याला Baojun E100 EV देखील म्हटले जाते. या कारला युवक आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी खास बनवण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, 4 सीटर ही कार एकदा चार्ज केल्यावर 250 किमीपर्यंत अंतर पार करू शकते. यामध्ये 29 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. जी 39 एचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क निर्माण करते. याचा टॉप स्पीड ताशी 100 किमी आहे. यामध्ये लिथियम ऑयन बॅटरी पॅक मिळेल, जे नॉर्मल चार्जरद्वारे 7.5 तासात फूल चार्ज होईल. या कारमध्ये रिजेनरेटिव्ह ब्रेक्रिंग सिस्टम मिळेल, जे ब्रेक लावल्यावर बॅटरी चार्ज करेल.
या कारचे व्हिलबेस 1600 एमएम व उंची 1670 एमएम असेल. याचे टर्निंग रेडियस 3.7 मीटर असेल. ज्यामुळे कमी जागेत देखील कार सहज पार्क करता येईल.

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात पेडेस्टेरियन लर्ट सिस्टम, पार्किंग सेंसर्स, चाइल्ड सेफ्टी लॉक्स, एंटी लॉक्स ब्रेक्स, पॉवर स्टेअरिंग, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक सारखे फीचर मिळतात. इंटेरियरमध्ये यात टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, ऑनबोर्ड वाय-फाय, टचपॅड कंट्रोलर, कीलेस एंट्री, एयर फिल्टर सारखे फीचर्स मिळतील.

या ऑटो एक्स्पोमध्ये जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ऑरा आर1 देखील सादर होणार आहे. या कारची किंमत 6.23 लाख ते 8.10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.