अ‍ॅमेझॉनच्या मालकाने चक्क स्वतः केली डिलिव्हरी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझॉस हे भारत दौऱ्यावर असताना मुंबईत आले होते. यावेळी ते स्वतः एका विले पार्ले भागातील किराणा स्टोर पोहचले. हे स्टोर अ‍ॅमेझॉनचे पिकअप पार्टनर आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉनवरून ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर या स्टोरवरून डिलिव्हरी घेऊ शकतात. जेफ बेझॉस यांनी यावेळी स्वतः एका ग्राहकाला डिलिव्हरी दिली.

त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत स्टोर मालक अमोलचे आभार मानले. जेफ बेझॉस यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, देशभरात हजारो स्टोर अ‍ॅमेझॉनचे पिकअप प्वाइंट आहेत. यामुळे ग्राहकांना फायदा होत आहे. सोबतच दुकानदारांची देखील अतिरिक्त कमाई होत आहे.

बेझॉस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून, त्यांची संपत्ती जवळपास 8.30 लाख कोटी आहे.

भारताच्या भेटीत बेझॉस यांनी भारतातील लघू-मध्यम उद्योगाना डिजिटल करण्यासाठी 7,100 कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगितले होते. तसेच अ‍ॅमेझॉन 2025 पर्यंत 10 अब्ज डॉलर किंमतीच्या मेक इन इंडिया वस्तूंची जगभरात निर्यात करणार आहे.

Leave a Comment