अवयवदान जागृकतेसाठी या जोडप्याने केला तब्बल 43 देशांचा प्रवास

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जोडप्याने अवयवदानाप्रती लोकांना जागृक करण्यासाठी मागील 400 दिवसांपासून एक खास मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान अनिल श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी दीपाली यांनी 43 देशातील 1 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. ते जागोजागी थांबून लोकांना अवयवदानाप्रती मार्गदर्शन करत आहेत. त्यांना अवयव दानाचे महत्त्व आणि त्यासाठी प्रेरणा देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 73 हजार लोकांची भेट घेतली आहे.

अनिल सांगतात की, त्यांनी 2014 मध्ये स्वतःच्या भावाला किडनी दान केली आहे. माझ्या भावाबद्दल असलेले प्रेमच या अभियानाचे कारण आहे. अवयवदान कोणीही करू शकते. हे प्रेण सर्वांसाठी आहे. अवयवदानामुळे तुम्ही एखाद्यासाठी देवदूत ठरू शकता. आपल्या अभियानाबद्दल ते सांगतात की, त्यांचे हे अभियान लाइव्ह असते. पत्नी कारमध्येच जेवण बनवते आणि तेथेच बेड तयार करते. एक वर्षांपासून हे जोडपे रस्त्यावरच रात्र काढत आहेत.

Image Credited – indiawest

अनिल आणि दीपाली यांनी आतापर्यंत अनेक शाळा, कॉलेज, रॉटरी क्लब, सामुदायिक केंद्र आणि कार्यालयांमध्ये अवयवदानाप्रती माहिती दिली आहे.

ते लोकांना अवयवदानाप्रती नैतिक आणि कायदेशीर बाबींबद्दल देखील माहिती देतात. अनिल यांचे 1997 ते 2006 पर्यंत रेडिओ टॉक शोसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नमूद आहे. मार्च महिन्यापासून ते न्यूयॉर्क ते अर्जेंटिना असा पुढील प्रवास सुरू करणार आहेत. याला त्यांनी ‘गिफ्ट ऑफ लाइफ एडव्हेंचर’ नाव दिले आहे.

Leave a Comment