वाडिया रुग्णालयाला द्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी


पुणे – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला माझा विरोध असून जो निधी या स्मारकासाठी देण्यात येणार आहे. वाडिया रुग्णालयासाठी तो निधी देण्यात यावा, असे सांगितले आहे. वाडिया रुग्णालय निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. वाडिया रुग्णालयावर ही वेळ सरकार आणि महापालिकेने अनुदान थकवल्यामुळे आली आहे. यासंदर्भात बोलताना पुणे येथे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

तुमच्याकडे स्मारकाची उंची वाढवण्यासाठी पैसे आहेत पण वाडिया रुग्णालयाला देण्यासाठी पैसे नाहीत असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले होते. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी यासंदर्भात बोलताना सांगितले आहे की, माझी न्यायालयाला नम्र विनंती आहे की इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याबाबत वाद आहे. या स्मारकाला माझाही विरोध आहे. बुद्धिमत्तेच्या कारणसाठी इंदू मिलची जागा ही वापरली गेली पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाला लागणारा निधी वाडिया रुग्णालयाला द्या असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनेकदा अटलबिहारी वाजपेयी हे चैत्यभूमीला येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांना ती जागा माहीत होती. म्हणूनच त्यांनी ती जागा इंटरनॅशनल स्कूल ऑफ स्टडीजसाठी दिली होती. पण या ठिकाणच्या राजकारण्यांनी ही जागा बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वापरल्यामुळे मी न्यायालयाला विनंती करतो की, स्मारकासाठी जो निधी दिला जाणार आहे तो निधी वाडिया हॉस्पिटला देण्यात यावा असे आदेश त्यांनी काढावे, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आहे.

Leave a Comment