इथिओपियाचा डेरारा हरीसा ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता


मुंबई – दरवर्षीप्रमाणे मुंबई मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनचे प्रत्येक वर्षाच्या जानेवारीमहिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजन केले जाते. या ड्रीम रनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात झाली. ही मॅरेथॉन आशियातील सर्वात मोठी व मानाची समजली जाते. ‘गोल्ड लेबल’ दर्जा या मॅरेथॉनला मिळालेला आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे.

देश-विदेशातील नामांकित धावपटू या वर्षीदेखील मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यासाठी केनिया, इथियोपियाचे धावपटू प्रबळ दावेदार मानले जातात. यंदाही इथिओपिआच्या धावपटू म्हणजेच डेरारा हरीसा मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये विजेता ठरला आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत इथिओपिआच्या डेरारा हरीसाने नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचे १७ वे पर्व असून एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर बक्षिस आहेत. देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. अर्धमॅरेथॉन महिला गटात उत्तर प्रदेशची पारुल चौधरी हिने प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. तर मुंबई कस्टम्सची आरती पाटीलने दुसरा क्रमांक आणि नाशिकच्या मोनिका आथरेचा तिसरा क्रमांक पटकावला आहे.

Leave a Comment