‘बर्गर किंग’ला व्हेज ऐवजी नॉनव्हेज बर्गर ग्राहकाला देणे पडले ६० हजारांना


चंदीगड – एका ग्राहकाने पंजाबमधील ‘बर्गर किंग’ या फास्ट फुडच्या दुकानाला चांगलाच हिसका दाखवला आहे. बर्गर किंगमधून मनीष कुमार नावाच्या एक ग्राहकाने दोन व्हेज बर्गर ऑर्डर केले होते. पण, त्यांना डिलीवरी बॉयने नॉनव्हेज बर्गर आणून दिले होते. मनीष कुमार यांनी यावरून ग्राहक संरक्षण मंचामध्ये धाव घेतली होती.

जालंधर येथील बर्गर किंग या दुकानात २०१८ साली मनीष कुमार बर्गर ऑर्डर केले होते. पण, व्हेज बर्गर ऐवजी नॉनव्हेज बर्गर त्यांना देण्यात आला. कुमार यांची प्रकृती नॉनव्हेज बर्गर खाल्ल्यानंतर बिघडली होती, तसेच त्यांना उलट्याही झाल्या होत्या, असे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांनी या घटनेनंतर बर्गर किंगला कर्मचाऱ्याने केलेल्या चुकीचा जाब विचारला. आपली चूक बर्गर शॉपने मान्यही केल्यानंतर ग्राहक संरक्षण मंचात बर्गर किंग विरोधात मनीष कुमार यांनी तक्रार दाखल केली. माझी प्रकृती नॉनव्हेज बर्गर खाल्यामुळे बिघडली तसेच धार्मिक भावना दुखावल्याने मला न्याय मिळावा, अशी मागणी तक्रारीत केली होती. याप्रकरणाचा निकाल १६ जानेवारी २०२० ला निकाल लागला. बर्गर किंगला 60 हजार रुपये नुकसान भरपाई पोटी देण्याचे आदेश ग्राहक संरक्षण न्यायालयाने दिले. यातील १० हजार रुपये वकिलाची फी म्हणून देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.

Leave a Comment