कबूतराच्या पंखांपासून वैज्ञानिकांनी तयार केला ‘कृत्रिम पक्षी’

आजच्या काळात मशीन्स आपल्या आयुष्यातील एक भागच झाल्या आहेत. ऑर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या विकासानंतर मशीनने मनुष्य आणि पशू-पक्ष्यांचे देखील रूप घेतले आहे. या गोष्टींना आपण रोबॉट म्हणतो. आता या तंत्राचा वापर करून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील स्टॅफोर्ड यूनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक फ्लाइंग मशीन तयार केली आहे, ज्यात 40 कबूतरांचे पंख लावण्यात आलेले आहेत. हे एक मशीन-पक्ष्याचे मिळतेजुळते रूप आहे. रिसर्च टिमने याला ‘पिजनबॉट’ नाव दिले आहे.

आर्टिफिशियल पाय आणि बोटांमुळे हे मशीन शिकारी पक्ष्यांप्रमाणे हवेत कलाबाजी करू शकते. पिजनबॉट पक्ष्यांप्रमाणे आवाज देखील काढू शकते. यामध्ये स्वतः आपला रस्ता निश्चित करणे व दिशा बदलण्याची क्षमता देखील आहे. हे सरळ झेप घेऊन वरच्या दिशेने सहज उडू शकते.

पिजनबॉट तयार करणारे एरिक चांग यांनी सांगितले की, पक्ष्यांचे पंख कोमल, मात्र मजबूत असतात.  रोबॉटिक्स आणि विमानात वापरले जाणारे पंख कडक असतात. त्यामुळे यासाठी कबूतरांच्या पंखाचा वापर करण्यात आला. जेणेकरून पक्षी यांचा वापर कसा करतात, हे समजू शकेल. हे मशीन तयार करण्याचा उद्देश पक्ष्यांचे जीवन समजून घेणे हा आहे.

पिजनबॉटमध्ये लावलेले हे पंख वेगवान वाऱ्याचा देखील सामना करू शकतात. तुटल्यावर त्यांना बदलता देखील येते. पिजनबॉटचे पंख अगदी कबूतरांच्या पंखांप्रमाणेच काम करतात.

Leave a Comment