नासाची ऑफर धुडकावत या युवा वैज्ञानिकाने घेतला देशसेवेचा प्रण

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासामध्ये काम करण्याचे स्वप्न अनेक वैज्ञानिकांचे असते. येथे काम करण्याची संधी मिळाली तर कदाचितच एखादी व्यक्ती नकार देईल. मात्र बिहारच्या भागलपूर येथे राहणारा एक युवा वैज्ञानिक गोपालजीने नासाकडून आलेली संशोधनाची ऑफर नाकारली आहे. त्याने भारतातच अनेक युवा वैज्ञानिकांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे.

गोपालजी 13 वर्षांचा असल्यापासूनच अनेक नवनवीन शोध लावत आहे. त्याला वयाच्या 14व्या वर्षीच देशातील सर्वात युवा वैज्ञानिक खिताबाने गौरवण्यात आले आहे.

गोपालजीने आतापर्यंत 10 पेक्षा अधिक शोध लावले आहेत. यामध्ये केळीच्या झाडापासून विजेची निर्मिती आणि पाण्यावर तरंगणारी विट सर्वाधिक चर्चेत आहे. जगभरात त्याने आपली ओळख निर्माण केली आहे.

गोपालजीच्या अन्य शोधामध्ये गोपोनियम एलॉय, बनाना बायोसेल, पेपर बायोसेल, गोपा अलस्का, लिची वाइन, हायड्रोइलेक्ट्रिक बायो सेल, जी स्टार पाउडर, सोलर मिलचा समावेश आहे. यातील दोन शोधांचे त्याला पेटंट देखील मिळाले आहे. तो सध्या आय स्मार्टचा ब्रँड अँम्बेसेटर आहे.

युवा वैज्ञानिक गोपालजीला एप्रिल महिन्यात अबुधाबीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स फेअरमध्ये मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्याने सांगितले की, नासाचे मिशन सोडून तो देशातील युवकांसाठी चांगल्या प्लॅटफॉर्मच्या शोधात आहे. ज्या युवकाना विज्ञानाच्या क्षेत्रात काही करायचे आहे, अशांच्या प्रतिभेला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Comment