अगडबम दहशतवाद्याला जेलमध्ये नेण्यासाठी बोलवावा लागला ट्रक

इराकच्या स्वॅट टीमने मोसूल शहरात दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या ठिकाणांवर छापेमारी केली. यावेळी टीमने शिफा अल निमा नावाच्या एका दहशतवाद्याला अटक केले. हा दहशतवादी एवढा जाडा होता की, त्याला ट्रकमध्ये टाकून कारागृहात नेण्यात आले.

दहशतवादी शिफाचे वजन 135 किलो आहे. जेव्हा त्याला पकडण्यात आले, त्यावेळी त्याला उठता देखील येत नव्हते. टीमने त्याला कारमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. अखेर त्याला ट्रकमध्ये टाकून नेण्यात आले. आयएसआयएसचे दहशतवादी त्याला ‘जब्बा द जेहादी’ म्हणतात.

शिफा अल निमाबद्दल तपास केलेले ब्रिटिश कार्यकर्ते माजिद नवाज यांच्यानुसार, शिफाचे काम आपल्या भाषणांद्वारे दहशतवाद्यांना तयार करून त्यांना लढण्यास सांगणे हे होते. त्याला सुरूवातीपासूनच आयएसआयएसचा मोठा नेता समजले जायचे. तो फतवा जारी करत असे व त्यानंतर दहशतवादी अनेकांना मारत असे. शिफाचे पकडणे दहशतवादी संघटनेसाठी मोठा झटका आहे.

Leave a Comment