हाय हिल घालत आहात; मग इकडे नक्की लक्ष द्या


प्रत्येक स्त्रीला उंच टाचाच्या शू घालून मिरवणे आवडते. स्त्रियांना आनंदी करण्याचे एक अनोखे कारण परदेशात अशाच एका पंचतारांकित हॉटेलने शोधले आहे. या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर महिलांनो – फ्लॅट शू आणि सँडल चालणार नाही. फक्त आणि फक्त हाय हिल. जर काही इजा झाली तर तो अपवाद असेल अशी पाटी लावली आहे.

हाय हिल आणि महिला हे हातात हात घालून चालणारे समिकरण आहे. पण कितीही उंच टाचाच्या चपलांवर प्रेम असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हाय हिल जास्त वेळ घालणे घातक आहे. एका सर्वेक्षणादरम्यान असे लक्षात आले आहे की, ४ इंचापेक्षा जास्त हिलचा वापर केल्यास पुढील पायावर ३० टक्के दबाव अधिक वाढतो.

त्याचबरोबर ६ तासापेक्षा अधिक काळ हाय हिलचा वापर केल्यास अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. उंच टाचाच्या चपल्लांचा वापर केल्यास पाठीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळेच अशक्तपणा आणि पाठीचा त्रास हा तुमचा कार्यक्रमातील उत्साह घालवू शकतो.

अशा प्रकारे घालवा टाचेतील वेदना
टाच जर का हाय हिलमुळे दुखत असतील तर पाय सरळ लांब करून पायाचा पुढची बोटे ताठ करावीत. त्यानंतर थोडे शांत बसून पाय टाचेकडून घड्याळ्याच्या काट्यांप्रमाणे फिरवावा. अशाच पद्धतीने दुसरा पायाला पण करावे.

दुसरा उपाय हा जरा हटके आणि आराम देणारा आहे. टेनिस बॉल किंवा पायावर ताण न आणणारा इतर कोणताही बॉल पायाच्या तळ्यावर थोडे प्रेशर देऊन गोलाकार पद्धतीने फिरवावा. यामुळे क्रॅम्प, पायातील वेदना आणि इतर त्रासातून थोडा आराम मिळतो.

काही काळ पायात चप्पल न घालता भिंतीला टेकून उभे रहा. दोन्ही हात भिंतीवर टेकवून पाय ताणा. आधी डावा पाय आणि नंतर उजवा पाय. असे ५ वेळा केल्यास आराम मिळेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment