देशात ‘हम दो हमारे दो’ कायदा आणणे आवश्यक – भागवत


नवी दिल्ली – सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोन ‘हम दो हमारे दो’संबंधीचा कायदा येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केलं आहे. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा विषय असल्याचे मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. मोहन भागवत यांनी हे वक्तव्य उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बंद दाराआड झालेल्या एका चर्चेत देशात दोन मुले जन्माला घालण्याचा कायदा आणला पाहिजे असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. त्याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, एका भव्य राम मंदिराची लवकरच निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल.

देशात सध्या लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलेच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही मोहन भागवत यांनी केले. लोकसंख्या अशा प्रकारच्या कायदा आणल्यास नियंत्रणात येईल असेही मोहन भागवत म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुले जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. तसेच देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment