ताजमहालचा ‘तो’ दरवाजा जो उघडण्यास सरकारही घाबरत आहे


नवी दिल्ली: काही दिवसापासून एक बातमी व्हायरल होत असून युट्युबमध्ये ट्रेंडिंग असलेल्या या व्हिडीओसोबत असे लिहिले आहे की ताजमहालमध्ये एक असा दरवाजा आहे, जो उघडण्यास सरकार देखील घाबरत आहे. याबातमी मागे किती सत्यता आहे हे कोणालाही माहीत नाही. पण व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये ही बातमी अग्रस्थानी आहे. आम्ही आज तुम्हाला ताजमहालच्या त्या दरवाज्याबाबत सांगणार आहोत जो उघडण्यास सरकार देखील घाबरत आहे.

व्हिडिओत सांगितले की ताजमहालची निर्मिती सन १६३१ साली सुरू झाली. आजही, ताजमहाल बांधकाम कौशल्य एक न जुळणारी नमूना म्हणून ओळखले जाते. यावर संशोधकांनी बरेच संशोधन केले आणि त्यांचे म्हणणे आहे की ताज महालच्या खाली हजार पेक्षा अधिक खोल्या आहेत. ते असेही म्हणतात ताजमहाल जेवढा जमिनीवर आहे त्यापेक्षा जास्त तो जमिनीच्या आत आहे.

त्यावेळेस जर कोणत्याही किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले तर बाहेर पडण्याचे मार्गही तयार केले गेले. असाच एक मार्ग ताजमहालमध्ये सुद्धा आहे. याखाली एक असा रस्ता आहे, जो भरपूर दुरवर जातो. परंतु या रस्त्यांना तळघराप्रमाणे शाहजहां यांनी बंद करून टाकले. ताजमहालच्या खाली असलेले खोल्या विटांचे बांधकाम करून बंद करण्यात आल्या आहेत.

संशोधकांचे असे देखील म्हणणे आहे की, ही जागा ताजमहालच्या बांधणीनंतर तयार करण्यात आली होती, त्यामुळे या खोल्या तयार झाल्यानंतर त्यांना विटांच्या माध्यमाने बंद करण्यात आले. असा हक्क केवळ सरकारकडे आहे कदाचित त्या दरवाज्या मागे एक मोठा खजिना असू शकतो. पुरातत्व शास्त्रज्ञ म्हणतात की त्या दरवाजामागे ऐतिहासिक दस्तावेज देखील असून शकतात, जे आपला इतिहास बदलू शकतात. आता या बातमी किती सत्यता आहे याबाबत काही माहीत नाही.

Leave a Comment