रिलायन्स इंडस्ट्रीजचा ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा


मुंबई : डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे. या कंपनीला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत झाला. कोणत्याही भारतीय कंपनीने नोंदवलेला हा सर्वोच्च तिमाही नफा आहे.

या कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत ११,२६२ कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. या कंपनीच्या इंधन शुद्धीकरणासह रीटेल व्यापार व टेलिकॉम व्यवसायाने नफ्यात लक्षणीय वाटा उचलला आहे. पण या तिमाहीत रिलायन्सच्या एकत्रित महसुलात चार टक्के घट नोंदवण्यात आली. रिलायन्सने डिसेंबरअखेरीस १,६८,८५८ कोटी रुपये महसूल प्राप्ती केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंतचा कमावलेला सर्वाधिक नफा आहे.

डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला ११ हजार ६४० कोटींचा नफा मिळाला. पण कंपनीच्या महसुलात विक्रमी नफा मिळवून देखील घसरण झाली आहे. कंपनीच्या महसुलावर तेल आणि रसायने उद्योगाच्या निराशाजनक कामगिरीमुळे परिणाम जाणवला. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत १६८८५८ कोटींचा महसूल मिळाला. ज्यात १.४ टक्के घसरण झाली. किरकोळ व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न रिलायन्स करणार आहे. ३१ डिसेंबर २०१९ अखेर कंपनीवर ३०६८५१ कोटींचे कर्ज आहे. मार्च २०१९ अखेर रिलायन्सवर २८७५०५ कोटींचे कर्ज होते.

Leave a Comment