डाळींब कर्करोगप्रतिबंधक


अजून तरी कर्करोगावर रामबाण औषध सापडलेले नाही. पण काही फळे आणि भाज्या या कर्करोगाला प्रतिबंध करू़ शकतात असे संशोधनात आढळून आले आहे .कारण चांगल्या आरोग्यासाठी लागणारी क्षमता फळांमुळे आणि भाज्यांमुळे वाढू शकते. काही फळांत तर असे घटक असतात की ते रोगाचा केवळ प्रतिबंधच करतात असे नाही तर ते काही रोगांना दुरुस्तही करतात. डाळींब हे फळ अशी क्षमता बाळगून असते. ते सामान्य आजार तर दुरुस्त करतातच पण कर्करोगासारखा धोकादायक आजारही बरा करू शकतात असेही संशोधकांचे म्हणणे आहे. डाळींबाचे गुण आणि घटक माहीत करून घेतल्यास त्याची ही ताकद आपल्याला कळेल. डाळींब हे मोठे आकर्षक फळ आहे. ते दिसायलाही आकर्षक असते आणि चवीलाही चांगले असते.

डाळिंबात लोह मुबलक असते. लोहाचे फायदे आपण चांगलेच जाणतो. लोहाचे प्रमाण कमी पडले की रक्तातले हिमोग्लोबीन कमी होऊन अशक्तता येते. कोणत्याही आजाराचा मुकाबला करण्याची ताकद कमी होते. त्यामुळे डाळींबातून लोह मिळायला लागले की, रोगप्रतिबंधक शक्ती वाढायला लागते. अनेक आजारांचा प्रतिबंध होतो. त्यात कर्करोगही दूर रहातो. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले मॅग्नीशीयम, व्हिटॅमिन ब६, पोटॅशियम आणि क जीवनसत्त्च हे सारे घटक डाळींबात असतात. या घटकांमुळे मानसिक नैराश्य, मधुमेह, त्वचाविकार आणि केसांचे विकार हे दुरुस्त होतात. असा डाळींबाचा महिमा आहे.

या सगळ्या विकारांना प्रतिबंध करण्याची क्षमता या फळात आहेच पण त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यात काही पॉलिफेनॉल्स आणि अँटीऑक्सिडंटस आहेत हे दोन घटक वातावरणातील रोगांना कारण ठरणार्‍या काही घटकांचा बंदोबस्त करतात. वातावरणातले हेच घटक प्रामुख्याने कर्करोगाला कारणीभूत ठरत असतात असे अनुमान आहे म्हणजेच डाळींब हे कर्करोगाला प्रतिबंध करते. त्यातले जीवनसत्त्व क हे फार उपयुक्त आहे तेही रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असते. तेव्हा असे म्हणाला काही हरकत नाही की, डाळींब हे फळ नित्य सेवन केल्यास कर्करोगाला दूर ठेवता येतेे. कर्करोग हा अजूनही तसा गूढ आहे. तो कसा होतो हे नेमकेपणाने कळलेेले नाही. पण कोणताही आजार होऊच नये असे उपाय केले तर इतर अनेक आजारांसोबतच कर्करोगाचाही प्रतिबंध होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment