कडीपत्ता बहुविध उपयोगाचा


राजकारणात काही नेते लोकांना कामापुरते वापरतात आणि त्यांचा वापर संपला की त्या लोकांना दूर करतात. अशावेळी ज्याचा वापर होऊन गेलेला असतो तो बिचार नेत्याला दूषणे द्यायला लागतो. आपल्या नेत्याने आपल्याला कडीपाल्यासारखे वापरले असे तो म्हणतो. भाजीपाल्यात आणि कढीत टाकला जाणारा हा कडीपाला राजकारणात कसा आला असा प्रश्‍न आपल्याला पडतो. पण नीट समजून घेतले पाहिजे आणि आपणच आपल्या जेवणात कडीपाला कसा वापरत असतो याचा विचार केला पाहिजे. आपल्या भाजीत आणि आमटीत कडीपाला त्याचा सुगंध येईपर्यंत वापरलेला असतो पण प्रत्यक्षात ती भाजी आपल्या ताटात येते तेव्हा मात्र आपण कडीपाला बाहेर काढून टाकतो आणि भाजी खातो. कडीपाला काढला जातो कारण भाजीला वास येणे हे त्याचे काम संपलेले असते.

खरे तर कडीपाला हा फार गुणकारी असतो. तो काही भाजी आणि आमटीला चांगला वास देण्यापुरता उपयोगाचा नाही. त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण भाजी आमटी खाताना आपण त्याला बाहेर काढून टाकतो म्हणजे त्याच्या औषधी गुणधर्माला आपण मुकतो. म्हणून आयुर्वेदात भाजी आणि आमटीत टाकण्यात आलेला कडीपाला काढून न टाकता चावून खाल्ला पाहिजे असे सांगण्यात आले आहे. तसा तो खाल्ला तरच त्याचा औषधी उपयोग आपल्याला होईल. या कडीपाल्याचे अनेक गुणधर्म आहेत. तो पित्तनाशक आहे. कडीपाला खाल्ल्याने पित्त कमी होते आणि पचनाचे प्रश्‍न सुटतात. अर्थात कडीपाला केवळ आहे तसाच खल्ला तर अनेक उपयोग आहेतच पण त्याचा काढा करून किंवा त्याला अन्य औषधात मिसळून खाल्ल्यासही त्याचे अनेक लाभ आहेत.

कडीपाल्याने केस लांब आणि दाट होतात. शरीराची कातडी तजेलदार होते. पण आपल्याला चमचमीत खाल्ल्यानंतर अपचन झाले असेल किंवा त्यावर कडीपाल्याचा काढा प्यावा. साजुक तूप, सुंठ, आणि कडीपाला हे एकत्र करून ते उकळून घ्यावे आणि अशा प्रकारे त्याचा काढा थंड झाल्यानंतर प्यावा. कडीपाला कितीही गुणकारी असला तरीही लोकांना तो चाऊन खावासा वाटत नाही. अशा लोकांसाठी एक उपाय आहे. कडीपाल्याची पाने भाजीत टाकण्यापेा कडीपाल्याची पावडर करून ती टाकावी. एक़दा पावडर करून टाकली की कोणीही त्याला भाजीतून काढून टाकू शकत नाही. तो सरळ पोटातच जातो. काही ठिकाणी अशी पावडर मिळायला लागली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment