नोकरी गेल्याने बरेच दिवस दुस-यांवर सहजासहजी विश्वास ठेवणे जाते कठीण


प्रत्येक तरूण मुलासाठी नोकरी हा तसा अगदी जिव्हाळ्याचा विषय असून प्रत्येकासाठी नोकरी मिळणे किंवा नोकरी शोधणे, अशा नोकरी संदर्भातील गोष्टी महत्वाच्या असतात. अनेकांना नोकरी लवकर न मिळणे आणि मिळालेली नोकरी सोडावी लागणे किंवा नोकरीवरून काढणे ह्याही तितक्याच गंभीर गोष्टींना सामोरे जावे लागते. अनेकांना विविध कारणांमुळे नोकरीला मुकावे लागते. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, नोकरी हातून गेल्यानंतर बरेच दिवस दुस-यांवर सहजासहजी विश्वास ठेवणे कठीण जाते. तसेच असेही समोर आले आहे की, दुसरी नोकरी मिळाल्यावरही दुस-यांवर विश्वास ठेवण्याला अनेक लोक घाबरतात. ही प्रक्रिया बरेच दिवस चालू राहते.

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधील संशोधक जेम्स लॉंरेस यांनी सांगितले की, नोकरी गेल्यावर रिकामे बसल्याने लोकांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि हा दृष्टीकोन खूप काळासाठी त्यांच्यात असतो. लॉंरेसने असे देखील सांगितले आहे की, फक्त नोकरी जाण्याचा अनुभव घेतलेल्यांबद्दल ही गोष्ट आहे असे नाही. तर त्यांच्या आसपासच्या समाजाशीही ह्या गोष्टी जुळलेल्या आहेत. कारण, ऎकमेकांवर विश्वास ठेवल्याने आरोग्यापासून सामाजिक एकता, चांगले लोकतंत्र आणि आर्थिक विकास यादृष्टीनेही लाभदायक असतो.

Leave a Comment